अ‍ॅपशहर

‘मनगाव’ टाकणार आधाराचे पाऊल...

मनोविकलांगतेमुळे कुटुंब व समाजाने दूर लोटलेल्या महिलांना आयुष्यभराचा आसरा देणाऱ्या माऊली सेवा प्रतिष्ठानने ‘मनगाव’च्या रुपाने मनोविकलांगांसाठी आधाराचे पहिले पाऊल टाकले आहे. येथील दीडशे खाटांचे हॉस्पिटल आता पूर्णत्वाकडे आहे.

श्रीराम जोशी | Maharashtra Times 21 Nov 2017, 3:00 am
नगरःमनोविकलांगतेमुळे कुटुंब व समाजाने दूर लोटलेल्या महिलांना आयुष्यभराचा आसरा देणाऱ्या माऊली सेवा प्रतिष्ठानने ‘मनगाव’च्या रुपाने मनोविकलांगांसाठी आधाराचे पहिले पाऊल टाकले आहे. येथील दीडशे खाटांचे हॉस्पिटल आता पूर्णत्वाकडे आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ते मनोरुग्णांच्या सेवेत रुजू होण्याच्या तयारीत आहे. मनगावचे हे अत्याधुनिक हॉस्पिटल मनोरुग्णांना आयुष्यभर आधार देणारे ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hospital for mentally disabled women
‘मनगाव’ टाकणार आधाराचे पाऊल...


डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे या दाम्पत्याने दहा वर्षांपूर्वी माऊली सेवा प्रतिष्ठानद्वारे मनोविकलांग महिलांवर उपचार करून त्यांचा सांभाळ करण्याचे व्रत स्वीकारले आहे. दानशुरांच्या मदतीने सुरू असलेले त्यांचे हे सेवाकार्य देशविदेशात पोचले आहे. अशा १०५ महिला व त्यांच्या १६ मुलांचे मिळून माऊलीचे भरभक्कम कुटुंब मनगाव रुपी कायमस्वरुपी आधाराच्या शोधात होते. येथील उद्योजक मेघमाला व बलभीम पठारे या दाम्पत्याने देहरे येथील स्वतःची तीन एकर जमीन दान केल्यानंतर ‘मनगाव’ची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली. त्यानंतर रोटरी इंटरनॅशनलने माऊली सेवा प्रतिष्ठानला ‘द वन ह्युमॅनेटिरियन अॅवॉर्ड’च्या रुपाने एक लाख डॉलर्सचे पारितोषिक दिल्याने त्या पैशांतून मनगावमध्ये पहिल्या टप्प्यातील दीडशे खाटांचे अद्ययावत रुग्णालय तयार झाले आहे. पुढच्या टप्प्यात येथेच आणखी ३५० खाटांचे तसेच स्वतंत्र १०० खाटांचे स्पेशालिटी रुग्णालय होणार आहे. त्यासाठी दानशुरांच्या मदतीची अपेक्षा ‘माऊली’ला आहे.

अनेकविध त्रासांचे दुर्दैव नशिबी आलेल्या ‘माऊली’तील महिलांना उपचारांतून बरे करणाऱ्या डॉ. धामणे दाम्पत्याने त्यांना गोपालन, शेतीत भाजीपाला उत्पादन, उदबत्ती तयार करण्याच्या प्रशिक्षणातून स्वावलंबीही केले आहे. ‘मनगाव’ हे आता अशा महिलांचे कायमस्वरुपी आधार होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज