अ‍ॅपशहर

श्रीराम मंदिर निर्माणासाठी नगरमध्ये हुंकार सभा

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्याबाबतची जनभावना प्रकट करण्यासाठी आणि मंदिर निर्माणातील बाधा दूर हटविण्यासाठी नगरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने गुरुवारी हुंकार सभेचे आयोजन केले आहे. गांधीमैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. याला जिल्ह्याच्या विविध भागातील संतमहंत उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Times 16 Dec 2018, 1:12 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hunkar rally for ram mandir
श्रीराम मंदिर निर्माणासाठी नगरमध्ये हुंकार सभा

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्याबाबतची जनभावना प्रकट करण्यासाठी आणि मंदिर निर्माणातील बाधा दूर हटविण्यासाठी नगरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने गुरुवारी हुंकार सभेचे आयोजन केले आहे. गांधीमैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. याला जिल्ह्याच्या विविध भागातील संतमहंत उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मंदिर निर्माणबाबत कायदा मंजूर करून श्रीराम मंदिर निर्माणच मार्ग प्रशस्त व्हावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील हिंदू समाजाला आवाहन करण्यासाठी हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले असून नगरची सभा २० डिसेंबर रोजी होणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर हे या सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. प्रज्ञाचक्षु हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर\R (पाथर्डी), सज्जनगडचे महंत मोहनबुवा रामदासी, देवगड संस्थानाचे भास्करगिरी महाराज (नेवासा), जोग महाराज संस्थानाचे श्रीराम महाराज झिंजुर्के यांचीही प्रमुख उपस्थिती या वेळी असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, दिनकर महाराज अंचवले, छगन महाराज मालुसरे, भूषण महाराज महापुरुष, द्यानंद महाराज कर्जतकर, आदिनाथ महाराज शास्त्री, अनिल महाराज वाळके, बाबा महाराज ठवळे, भागवत महाराज उगले, लक्ष्मण महाराज कराड हे देखील या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी हिंदू समाजाने या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री डॉ. प्रदीप उगले, जिल्हा सहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दल जिल्हा संयोजक गौतम कराळे, प्रांत प्रचार प्रसिद्धी सदस्य अमोल भांबरकर यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज