अ‍ॅपशहर

छिंदमच्या अर्जाची चौकशी सुरू

महानगरपालिकेतील उपमहापौरपदाचा राजीनामा दिलेल्या नसून, महापौर व आयुक्त यांनी खोटा राजीनामा सादर करून तो मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस स्टेशनला केली आहे. छिंदम दिलेल्या तक्रार अर्जावर चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती तोफखान्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.

Maharashtra Times 21 Jul 2018, 3:11 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम inquiry of shripad chindams application started
छिंदमच्या अर्जाची चौकशी सुरू

महानगरपालिकेतील उपमहापौरपदाचा राजीनामा दिलेल्या नसून, महापौर व आयुक्त यांनी खोटा राजीनामा सादर करून तो मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस स्टेशनला केली आहे. छिंदम दिलेल्या तक्रार अर्जावर चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती तोफखान्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी उपमहापौर पदावर असलेल्या श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. भाजपकडून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला होता. छिंदम याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर काही दिवस त्याला नगरमधून हद्दपार करण्यात आले होते. आता त्याने राजीनामासंदर्भात एक अर्ज पोलिसांकडे केला आहे. तुरुंगात असताना उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नव्हता. महापौर सुरेखा कदम, त्यांचे पती संभाजी कदम, तत्कालीन मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी बोगस राजीनामा तयार करून तो मंजूर करून घेतला, असा आरोप तक्रारीत छिंदम याने केला आहे. या अर्जाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार महापौर व इतरांकडे पोलिसांना चौकशी करावी लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज