अ‍ॅपशहर

अंतिम युक्तिवाद लांबणीवर

कोपर्डी खटल्यात आरोपीचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे हे न्यायालयात गैरहजर राहिल्याने अंतिम युक्तिवादाची सुनावणी सुरू होऊ शकली नाही. आता ही सुनावणी दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर २६ ऑक्टोबरपासून ठेवण्यात आली आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kopardi last argument is prolonged
अंतिम युक्तिवाद लांबणीवर

कोपर्डी खटल्यात आरोपीचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे हे न्यायालयात गैरहजर राहिल्याने अंतिम युक्तिवादाची सुनावणी सुरू होऊ शकली नाही. आता ही सुनावणी दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर २६ ऑक्टोबरपासून ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठी पुण्यावरून नगरला येत असताना वाघोली येथे वाहतूक ठप्प झाल्याने सुनावणीला येता आले नाही, असे अॅड. खोपडे यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. अॅड. निकम हे नगरमध्ये पहाटे आले होते. अॅड. खोपडे यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने न्यायालयातील पोलिस कर्मचाऱ्याला मोबाइलवरून संपर्क साधून अॅड. खोपडे हे नगरला येण्यासाठी पुण्यावरून निघाले होते. परंतु वाघोली येथे वाहतूक ठप्प झाल्याने त्यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली आहे. त्यामुळे न्यायालयात वेळेवर पोहचू शकत नसल्याने पुन्हा पुण्याला जात असल्याचे सांगितले. ही माहिती पोलिस कर्मचाऱ्याने न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने आरोपी जितेंद्र शिंदेचे वकील अॅड. योहान मकासरे यांना फोन करून अॅड. खोपडे यांच्या गैरहजर राहण्याबाबत विचारले. अॅड. मकासरे यांनी खोपडे हे वाहतूक कोंडीत अडकल्याने येऊ न शकल्याचे न्यायालयात सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज