अ‍ॅपशहर

'आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला!'

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने आज तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना 'निर्भया'च्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. 'आज खऱ्या अर्थाने माझ्या छकुलीला न्याय मिळाला', अशी भावना तिने व्यक्त केली.

Maharashtra Times 29 Nov 2017, 3:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kopardi rape and murder case victims mother reaction after court verdict
'आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला!'

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने आज तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना 'निर्भया'च्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. 'आज खऱ्या अर्थाने माझ्या छकुलीला न्याय मिळाला', अशी भावना तिने व्यक्त केली.

यावेळी 'निर्भया'च्या आईने न्यायव्यवस्था आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे आभार मानले. 'पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा मनापासून तपास केला. मराठा समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी आम्हाला साथ दिली. मराठा समाज एकवटला. माझ्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी मोर्चे काढले. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. त्यांच्यामुळेच माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाज आणि महाराष्ट्राचे मी आभार मानते, असे ती म्हणाली.

दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर 'निर्भया'ची आई भावूक झाली. प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते, असे सांगतानाच त्यांना अश्रू अनावर झाले. 'पहिली लढाई जिंकली आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि दोषींना फाशी व्हावी, यासाठी शेवटपर्यंत लढा देणार आहे. कुणावरही अशा प्रकारे अत्याचार होऊ नयेत. कोणत्याही छकुलीवर अत्याचार झाल्यास मी स्वतः धावून जाईन,' असा निर्धारही तिने केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज