अ‍ॅपशहर

नगरमध्ये पारा घसरला ५.६ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, नगरशनिवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी तापमान ५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. या हंगामातील नगरमधील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे.

Maharashtra Times 11 Dec 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lowest temperature in nagar
नगरमध्ये पारा घसरला ५.६ अंशांवर


शनिवारी पहाटे नगरमध्ये राज्यातील नीचांकी तापमान ५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. या हंगामातील नगरमधील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसगरातील चक्रीवादळाचा राज्यातील हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता असून पुणे वेधशाळेने मंगळवारपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगरच्या तापमानात घट होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घटल्याचे सांगण्यात येते. शनिवारी पारा ५.६ अंशावर उतरला. सरासरीच्या तुलनेत तापमान ७ अंशाने घसरले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात २०१३ मध्ये किमान तापमान ४.८ तर २०१२ मध्ये ५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. नगरमध्ये डिसेंबरमधील ३.३ असा नीचांक १९२६ मध्ये नोंदला गेलेला आहे. तीन वर्षांनंतर यंदा पुन्हा कडाक्याची थंडी पडली आहे. नगरमध्ये सकाळी कडाक्याची थंडी होती. त्यामुळे लोकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे आणि शेकोटीचाही आधार घेतला. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या घटली होती. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे सरकत असून १२ डिसेंबरपर्यंत ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर येण्याचा अंदाज वतर्विण्यात आला आहे.


राज्यात कडाका

राज्यातील अन्य काही शहरांमध्येही थंडी आहे. मुंबई १५.७, नाशिक ७.५, पुणे ८.४, जळगाव ९.०, मालेगाव ९.४, औरंगाबाद १२.४ अंशसेल्सिअस असे तापमान आहे. विदर्भात २४ तासांमध्ये काही भागात शीतलहर जाणवण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज