अ‍ॅपशहर

अश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या

अश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावून हा फोटो व्हायरल करणाऱ्या पतीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने अजून किती महिलांचे अश्लील फोटो तयार केले? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Authored byसंदीप कुलकर्णी | Edited byभीमराव गवळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2020, 1:48 pm
नगर: अश्लील फोटोला स्वत:च्या पत्नीचा चेहरा लावून हा फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील दुर्गम भागात घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी या महिलेच्या पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीने आतापर्यंत किती महिलांचे अश्लील फोटो तयार केले याचा तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या
अश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या


एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर या महिलेला अॅड केल्यानंतर त्यात हा फोटो व्हायरल झाल्याने घाबरलेल्या या महिलेने १७ सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. १३ सप्टेंबर रोजी संबंधित महिलेला अज्ञात व्यक्तीने 'माझे पिल्लू माझ्यावर रुसले' या अनोळखी व्हॉटसअँप ग्रुपला अॅड केले होते. तसेच या ग्रुपवर संबंधित महिलेचा चेहरा लावलेला व खाली नग्न अवस्थेतील दुसरा फोटो लावलेला असा फोटो व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर या ग्रुपवरच सदर महिलेला हा फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच या महिलेला दमदाटी करून जिवे मारण्याची धमकीही देण्यात दिली होती. याबाबत संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक! हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या सूचनेनंतर सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, विशाल अमृते, भगवान कोंडार, पूजा भांगरे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने या गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण केले. यावेळी फोटो व्हायरल करणारा आरोपी निळवंडे (ता .अकोले) परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने निळवंडे येथे जावून तांत्रिक विश्लेषण व माहिती घेतली. तसेच जवळील पिंपरी परिसरात सापळा लावला आणि तेथून आरोपीला अटक केले. हा आरोपी संबंधित महिलेचा पती आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

रस्त्यावर हातात चाकू घेऊन दहशत; पोलिसांवरच केला हल्ला

आरोपीने स्वत:च्या मोबाइलमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे सिमकार्ड वापरून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला मोबाइल व सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहे. हा आरोपी दुर्गम भागातील असून व केवळ दहावी शिकलेला आहे. त्याने अशा प्रकारे किती महिलांना त्रास दिला आहे, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

करोनामुळे पतीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या, २ मुलं झाली पोरकी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज