अ‍ॅपशहर

मनोविकलांग महिलांना ‘जय आनंद’चा आधार

​नगर : मनोविकलांग अवस्थेतून नियमित उपचारांच्या मदतीने प्रकृती स्वास्थ्य सुधारत असलेल्या महिलांना आधार देण्यासाठी येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या महिला विभागानेच पुढाकार घेतला. माऊली सेवा प्रतिष्ठानमधील महिलांना दैनंदिन गरजेचे कपडे व अन्य आवश्यक साहित्य नुकतेच दिले गेले.

Maharashtra Times 20 Mar 2017, 9:39 pm
नगर : मनोविकलांग अवस्थेतून नियमित उपचारांच्या मदतीने प्रकृती स्वास्थ्य सुधारत असलेल्या महिलांना आधार देण्यासाठी येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या महिला विभागानेच पुढाकार घेतला. माऊली सेवा प्रतिष्ठानमधील महिलांना दैनंदिन गरजेचे कपडे व अन्य आवश्यक साहित्य नुकतेच दिले गेले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manovikalanga help women
मनोविकलांग महिलांना ‘जय आनंद’चा आधार

नगर-मनमाड रोडवरील शिंगवे नाईक (ता. नगर) येथे डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे दांपत्य माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १००वर महिला व त्यांच्या १५ मुला-मुलींचा सांभाळ करतात. यापैकी बहुतांश महिला मनोविकलांग अवस्थेत माऊलीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांचे समुपदेशन व वैद्यकीय उपचार झाल्याने यातील महिलांचे मानसिक स्वास्थ्य सुधारले आहे. पण अशा बऱ्या झालेल्या महिलांनाही त्यांचे कुटुंबिय स्वीकारत नसल्याने या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न माऊलीचे सुरू आहेत. तसेच त्यांच्या आवश्यक गरजांसाठी दानशुरांची मदत घेतली जात आहे. याच भावनेने जय आनंद महावीर मंडळाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा राखी मुनोत यांच्यासह सदस्य सुरेखा बोरा, सोना डागा, भारती गांधी, संध्या मुथा, सुमित्रा ओस्तवाल, दीपाली मुनोत, राधिका कासवा, सविता मुथा, पिंकी राका आदींनी नुकतेच माऊलीमध्ये जाऊन तेथील महिलांना कपडे, औषधे व अन्य गरजेचे साहित्य दिले. निराधार, मनोविकलांग महिलांना मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याची भावना या वेळी अध्यक्षा मुनोत यांनी व्यक्त केली. या मदतीबद्दल डॉ. सुचेता धामणे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना अन्य महिला मंडळांनी असा आदर्श घेण्याची गरज व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज