अ‍ॅपशहर

कार्यालयातील कर्मचारी नातेवाईकांकडे चौकशी

शेवगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारपासून सुरू केला आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम massacre at shevgaon
कार्यालयातील कर्मचारी नातेवाईकांकडे चौकशी

शेवगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारपासून सुरू केला आहे. या गुन्ह्याबाबत हरवणे यांचे नातेवाइक व ते नोकरीला असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे सोमवारी चौकशी करण्यात आली. परंतु तपासाच्या दृष्टीने पोलिसांना ठोस माहिती मिळू शकली नाही.
रविवारी मध्यरात्री अप्पासाहेब गोविंद हरवणे व त्याची पत्नी, मुलगा व मुलगी असा चार जणांचा निर्घृणपणे खून झाला. या चौघांची पोस्टमार्टम औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नेमले आहेत. अप्पासाहेब हरवणे हे शेवगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयात आरेखक म्हणून नोकरीला होते. एखाद्या ठिकाणी जमिनीच्या मोजणीवरून वाद झाला होता का? त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने चौकशी केली. तर, महिन्याभरात शेतजमिनीची मोजणी केलेल्या शेतकऱ्यांकडे पोलिस चौकशी करणार आहेत. तपासातील एका पथकाने शेवगावमधील एका गावात जाऊन चौकशी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज