अ‍ॅपशहर

पाठिंब्याने भारावले गुणवंत

उच्च शिक्षणाच्या स्वप्नपूर्तीसाठी दानशुरांनी भरभरून दिलेले आर्थिक पाठबळ शारदा पवार, राजेश चौधरी व सोनाली बनकर या तिन्ही गुणवंतांना भारावून गेल्याची अनुभूती आज देऊन गेले. ‘नवा आत्मविश्वास देणारा हा आधार आमची उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती नक्कीच करेल व आम्हीही भविष्यात समाजातील गरीब गुणवंतांच्या पाठीशी उभे राहू’, अशी ग्वाहीही या तिघांनी आवर्जून दिली.

Maharashtra Times 15 Aug 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mata helpline cheque distribution
पाठिंब्याने भारावले गुणवंत


उच्च शिक्षणाच्या स्वप्नपूर्तीसाठी दानशुरांनी भरभरून दिलेले आर्थिक पाठबळ शारदा पवार, राजेश चौधरी व सोनाली बनकर या तिन्ही गुणवंतांना भारावून गेल्याची अनुभूती आज देऊन गेले. ‘नवा आत्मविश्वास देणारा हा आधार आमची उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती नक्कीच करेल व आम्हीही भविष्यात समाजातील गरीब गुणवंतांच्या पाठीशी उभे राहू’, अशी ग्वाहीही या तिघांनी आवर्जून दिली. यानिमित्ताने, ‘गुणवंतांच्या पाठीशी उभे राहण्याचा मटा हेल्पलाइन’ उपक्रम कौतुकास्पद असल्याची’ भावना जिल्हाधिकारी अभय महाजन व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.

‘मटा हेल्पलाईन’अंतर्गत ‘बळ द्या पंखांना’ उपक्रमात शारदा पवार, राजेश चौधरी व सोनाली बनकर या दहावीतील गुणवंतांच्या उच्च शिक्षणासाठी दानशुरांनी दिलेले मदतीचे दान जिल्हाधिकारी महाजन व पोलिस अधीक्षक शर्मा यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले. येथील ‘सीएसआरडी’ संस्थेच्या गोल्डन ज्युबिली सभागृहात झालेला हा हृद्य सोहळा उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी आई-वडिलांसमवेत शेतमजुरी करता करता जिद्दीने अभ्यास करून दहावीत ९१ टक्के गुण मिळवणारी शारदा विलास पवार (रा. कोडेगव्हाण, ता. श्रीगोंदे), वडील हॉटेलमध्ये वेटर असल्याने कौटुंबिक आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही दहावीत ९६.२० टक्के गुणांसह कष्टसाध्य यश मिळवणारा राजेश विश्वजित चौधरी आणि चहाची टपरी चालवणारे वडील व शेतमजुरी करणाऱ्या आईने प्रोत्साहन दिल्याने अहोरात्र अभ्यास करून दहावीत ९१.४० टक्के गुण मिळवणारी सोनाली सोपान बनकर (रा. राळेगण म्हसोबा, ता. नगर) या तिन्ही गुणवंतांच्या जिद्दीची कहाणी उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवून गेली व या तिघांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपलाही खारीचा वाटा असल्याचा अभिमान उपस्थित दानशुरांना देऊन गेला.

जिल्हाधिकारी महाजन यांनी तिन्ही गुणवंतांचे कौतुक करताना, ‘दहावीत ज्या जिद्दीने यश मिळवले, तशीच जिद्द पुढेही ठेवून उच्च शिक्षण पूर्ण करण्याच्या’ शुभेच्छा त्यांना दिल्या. तर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी, ‘तुमच्या दृढ इच्छाशक्तीला ‘मटा’ची साथ मिळाली असल्याने जास्त मेहनत करून उच्च शिक्षण पूर्ण करा आणि ‘मटा’ व दानशुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करा’, असा सल्ला दिला. ‘मटा’चे नगरचे ब्युरो चीफ विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविकात ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाची माहिती दिली. प्रिन्सीपल करस्पाँडन्ट श्रीराम जोशी यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज