अ‍ॅपशहर

अन् मंत्री दुचाकी घेऊन आदिवासी पाड्यावर पोहोचले!

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज थेट बाइकवरून प्रवास करत आदिवासी पाडा गाठला आणि तेथील विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले. (Prajakt Tanpure inaugurates transformer at adivasi pada)

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2020, 11:05 am
अहमदनगर: दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावरील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे थेट अरुंद रस्त्यावरून दुचाकीवर तेथे पोहोचले. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे हे उद्घाटन खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेल्याच्या भावनाही तनपुरे यांनी ट्वीट करीत व्यक्त केल्या आहेत. (Prajakt Tanpure inaugurates transformer at adivasi pada)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Prajakt Tanpure


राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे तेथील नागरिकांच्या नशिबी कायमच अंधार असल्याचे चित्र होते. वीज नसल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता येथे वीज पोहोचवण्यात राज्य सरकारला यश आले असून तेथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. याबाबतचा अनुभवच मंत्री तनपुरे यांनी ट्विटवर शेअर केला आहे.

वाचा: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत; शरद पवारांनी सांगितले कारण

तनपुरे यांनी म्हटलय, ‘बोंबलदरा, अगदी कमी वस्ती असलेला माझ्या आदिवासी बांधवांचा पाडा. राहुरी-संगमनेर सीमेवर, दूरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. आज मी स्वतः अरुंद वाटेवरून मोटारसायकलने प्रवास करत येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले. मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्य प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला.’ दरम्यान, ट्विटवर आपल्या भावना व्यक्त करतानाच तनपुरे यांनी त्यासोबत एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

वाचा: दानवेंचे गावरान विधान; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज