अ‍ॅपशहर

अपघातग्रस्त कंटेनरमधील मोबाइल नेले

नगर-पुणे स्त्यावरील चासच्या धोकादायक वळणावर कंटेनरच्या अपघातात कंटेनरखाली चिरडून चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. रस्त्यावर पडलेल्या चालकाच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची कंटेनरमधील मोबाइल पळवण्यासाठी स्पर्धाच सुरू होती.

Maharashtra Times 28 Oct 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobiles stolen from accident place
अपघातग्रस्त कंटेनरमधील मोबाइल नेले


नगर-पुणे स्त्यावरील चासच्या धोकादायक वळणावर कंटेनरच्या अपघातात कंटेनरखाली चिरडून चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. रस्त्यावर पडलेल्या चालकाच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी कंटेनरमधील मोबाइल पळवण्यासाठी स्पर्धाच सुरू होती. सुमारे अर्ध्या तासानंतर पोलिस घटनास्थळी आले तोपर्यंत चालकाचा मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता.

नगरच्या दिशेने कंटेनर (एम एच १२ केपी ३१६५) गुरुवारी दुपारी येत होता. चालकाला चासच्या धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर डिव्हायडरवर धडकला. कंटेनर उलटल्याने चालकाने जीव वाचविण्यासाठी खाली उडी मारली. त्यात चालक डिव्हायडरवर पडला आणि त्याच वेळी कंटेनर त्याच्या अंगावर पडून कंटेनर चालकाचा चिरडून मृत्यू झाला. चालकाचा मृतदेह बेवारसपणे रस्त्यावर सुमारे अर्धातास तसाच पडून होता. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या स्वराज माझदा कंपनीच्या मालगाडीला (क्र. एम एच ४२ डी ८९८१) कंटेनरने ठोकरले. दुसरे वाहन पवार वस्तीच्या बाजूकडील गटारात कोसळले. या अपघातात कंटनेरमधील एक गंभीर जखमी झाला असून इतर चार जण जखमी झाले. एकिकडे या अपघातात जखमी झालेल्यांना चासच्या ग्रामस्थांनी जखमींना तातडीने वाहनांची व्यवस्था करून रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे अपघातानंतर कंटेनरमधील मोबाइलचे बॉक्स रस्त्यावर विखुरले होते.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामस्थ वाहतूक नियंत्रण करीत असताना दुचाकीवरील तसेच चारचाकीमधील प्रवाशांची मात्र मोबाइलचे बॉक्स पळविण्यासाठी स्पर्धा लागली होती. तालुका पोलिस स्टेशनला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तोपर्यंत लाखो रुपयांच्या मोबाइलची चोरी झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज