अ‍ॅपशहर

मोदी देश विकायला निघालेत’

देशातील हिंदुत्वाला खरा धोका अन्य कोणापासून नसून तो आरएसएसपासून आहे. एकिकडे संविधान मानणारे आणि दुसरीकडे संविधानाला विरोध असलेल्यांची लढाई देशात सुरू आहे. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या नकली देशभक्तांचा पराभव आवश्यक असून चहावाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केली.

Maharashtra Times 6 Nov 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi is going to sell the country
मोदी देश विकायला निघालेत’

देशातील हिंदुत्वाला खरा धोका अन्य कोणापासून नसून तो आरएसएसपासून आहे. एकिकडे संविधान मानणारे आणि दुसरीकडे संविधानाला विरोध असलेल्यांची लढाई देशात सुरू आहे. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या नकली देशभक्तांचा पराभव आवश्यक असून चहावाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केली.
संगमनेरमध्ये शेतकरी नेते, माजी आमदार कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि २३ व्या स्मृतीदिनानिमित्ताने कन्हैया कुमारच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कन्हैया कुमार म्हणाला की, देशात धर्म आणि रोजीरोटीचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. देशातील सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर जे काही थोडेफार लोक बोलत आहेत, त्यांना त्रास दिला जातो, तुरुंगात टाकले जात आहे, नाहीतर त्यांचा कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी केला जात आहे. त्यांच्या हत्या होत आहेत. ज्यात सामान्य जनतेचा सहभाग नसेल ते प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रवाद होऊ शकत नाहीत. तो केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा राजनितीक प्रश्न ठरू शकतो. संवाद दोन पक्षांत व्हायला हवा तो एकतर्फी झाला तर तो संवाद नसतो तो एक आदेश असतो. बिहार सरकारची शिक्षणाला प्राथमिकता नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज