अ‍ॅपशहर

दंडमाफीबाबत सकारात्मक भूमिका

मनपाच्या थकित असलेल्या मालमत्ता करांवर आकारण्यात आलेल्या दंड रकमेवर सवलत देण्याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी ग्वाही मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिली आहे.

Maharashtra Times 27 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम municipal commitioner assure about fine exeption
दंडमाफीबाबत सकारात्मक भूमिका


मनपाच्या थकित असलेल्या मालमत्ता करांवर आकारण्यात आलेल्या दंड रकमेवर सवलत देण्याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी ग्वाही मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या निर्णयाची थकबाकीदारांना प्रतीक्षा आहे.

महापालिकेने लाखो रुपयांची संकलित कर थकबाकी असलेल्या ४९४ थकबाकीदारांची नावे वेबसाइटवर प्रसिद्ध करून या थकबाकीदारांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी दिली आहे. वारंवार नोटिसा पाठवून व विनंती करूनही थकबाकी भरण्याबाबत चालढकल होत असल्याने अखेर उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनी पहिल्या टप्प्यात सात मालमत्ता सील करून त्यांच्या लिलावाची कारवाई सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल ४९४ थकबाकीदारांना वेबसाइटद्वारे ग्लोबल प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे थकबाकीदार मंडळी अस्वस्थ झाली आहेत. शहरातील विविध नामवंत शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व मान्यवर व्यक्तींची नावे यादींमध्ये आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी बुधवारी आयुक्त मंगळे यांना भेटून संकलित कर थकबाकीवर आकारण्यात आलेली दंड रक्कम १०० टक्के माफ करण्याची मागणी केली होती. मात्र, २१० कोटींच्या एकूण थकबाकीमध्ये ८० कोटींची दंड रक्कम असल्याने तसेच या येणे रकमेची नोंद मनपाच्या यंदाच्या बजेटमध्येही असल्याने प्रशासनाकडून दंड माफीबाबत असमर्थता व्यक्त केली गेली होती; मात्र, यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने गुरुवारी सायंकाळी पुन्हा बैठक झाली. आमदार जगताप यांच्यासह उबेद शेख, दीपक सुळ, प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, बाबा गाडळकर व अन्य कार्यकर्त्यांनी आयुक्त मंगळे यांच्याशी चर्चा केली. उपायुक्त चव्हाण या वेळी उपस्थित होते.

मनपाच्या आर्थिक अडचणीची मांडणी या वेळी प्रशासनाकडून केली गेली; मात्र, दंडमाफी दिल्यास मनपाची वसुली गतिमान होऊन विकासकामांसाठी पैसे उपलब्ध होऊ शकतात, असे आंदोलकांद्वारे सांगण्यात आले. त्यामुळे दंडमाफीच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याची लेखी ग्वाही आयुक्त मंगळे यांनी दिली. आतापर्यंत देण्यात आलेल्या दंडमाफीबाबत अभ्यास करून तसेच मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायाचा विचार करून दंडमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज