अ‍ॅपशहर

पैशांच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

हात उसणे घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून बाळू बजरंग पवार (खर्डा ता. जामखेड ) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत मयताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2019, 12:33 pm
अहमदनगर : हात उसणे घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून बाळू बजरंग पवार (खर्डा ता. जामखेड ) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत मयताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder after dispute over payment
पैशांच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून



सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व राहणार खर्डा) या पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच ग्रामस्थांकडून खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल आहे. घटनास्थळी शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलीस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज