अ‍ॅपशहर

सराफ व्यापाऱ्याचा खून; आरोपीला जन्मठेप

नगर येथील सराफ व्यापारी सत्यम शांतिलाल वर्मा (वय ३६) यांच्या खून खटल्यातील आरोपी स्वप्नील रमेश ढवळे (वय २२, रा. वांबोरी, ता. राहुरी) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यामध्ये एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले होते.

Maharashtra Times 13 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder of a gold trader the accused sentenced to life imprisonment
सराफ व्यापाऱ्याचा खून; आरोपीला जन्मठेप

नगर येथील सराफ व्यापारी सत्यम शांतिलाल वर्मा (वय ३६) यांच्या खून खटल्यातील आरोपी स्वप्नील रमेश ढवळे (वय २२, रा. वांबोरी, ता. राहुरी) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यामध्ये एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले होते.

सत्यम वर्मा पाइपलाइन रस्त्यावर राहत होते, तर जेऊर (ता. नगर) येथे त्यांचे सराफी दुकान होते. ते दुचाकीवर जाऊन-येऊन काम पाहत होते. ४ मे २०१५ रोजी मयत वर्मा हे नगर येथून दुचाकीवर जेऊर येथील दुकानावर गेले होते. परंतु ते रात्री घरी न आल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्मा यांचा शोध घेत असताना पोलिसांना नगर-औरंगाबाद हायवेवरील जेऊर जवळच्या टोल नाक्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. तीक्ष्ण हत्याराने वार करून सत्यम वर्मा यांचा खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी स्वप्नील रमेश ढवळे याला ताब्यात घेऊन चौकशी केले असता आरोपीने खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तपासी अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर

यांच्यासमोर चालला.

खटल्यामध्ये एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी स्वप्नील ढवळे याला कलम ३०२ नुसार दोषी धरून जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी तर कलम २०१ नुसार दोन वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी कामकाज पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज