अ‍ॅपशहर

आर्किटेक्ट कॉलेजला मान्यता

अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची सुविधा असलेल्या नगर शहरात आता पहिले आर्किटेक्चर महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे.

Maharashtra Times 14 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar architect college recognized
आर्किटेक्ट कॉलेजला मान्यता

अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची सुविधा असलेल्या नगर शहरात आता पहिले आर्किटेक्चर महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे. येथील रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टने त्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला नवी दिल्लीच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरसह महाराष्ट्र सरकारनेही मान्यता दिली आहे. नगर-सोलापूर रोडवरील वाकोडी येथे येत्या दोन महिन्यात या महाविद्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.
१२वीनंतर अभियांत्रिकी, व्यवस्थापन वा वैद्यकीय शिक्षणाची सुविधा नगरमध्ये आहे. पण आर्किटेक्ट अभ्यासक्रमासाठी पुण्या-मुंबईतील महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते. नगरच्या शैक्षणिक समृद्धीतील ही कमतरता भरून काढण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्टसाठीच्या बाहेरगावच्या शैक्षणिक खर्चात बचत होण्यासाठी येथील सीए रमेश फिरोदिया व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. शरद कोलते यांनी पाठपुरावा केला. रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संस्थेच्या माध्यमातून वाकोडी येथील तीन एकर परिसरात इमारत उभारली. या इमारतीची पाहणी नुकतीच दिल्लीच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या दोन परीक्षकांनी नुकतीच केली. प्राचार्य, शिक्षक व अन्य कर्मचारी तसेच या महाविद्यालयात असलेल्या ग्रंथालय, अॅम्पिथिएटर, संगणक प्रयोगशाळा, स्टुडियो, खेळाचे मैदान व अन्य सुविधांची तपासणी केली. त्यानंतर या महाविद्यालयाला कौन्सिलद्वारे नुकतेच मान्यतेचे पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही आवश्यक असलेली परवानगी नुकतीच दिली आहे. या महाविद्यालयाच्या अधिक माहितीसाठी संपर्क-९५५२०४४५०९.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज