अ‍ॅपशहर

अहमदनगर : शेतमजुराच्या मुलीला हवंय पाठबळ

सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करणे, घर कामामध्ये आईला मदत करून दररोज शाळेला सहा किलोमीटर पायी जाणे, शाळेतून आल्यानंतर पुन्हा घरकाम करून रात्रीच्या वेळी अभ्यास करणे... असा संघर्षमय प्रवास करून कोंडेगव्हाण (ता.श्रीगोंदा) येथील शारदा पवारने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले आहेत. आता पुढील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा मोठा अडसर आहे.

Maharashtra Times 3 Jul 2017, 2:46 pm
Sandip.Kulkarni@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar helpline sharada pawar
अहमदनगर : शेतमजुराच्या मुलीला हवंय पाठबळ

Tweet : @sandipkulMT

नगर:सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करणे, घर कामामध्ये आईला मदत करून दररोज शाळेला सहा किलोमीटर पायी जाणे, शाळेतून आल्यानंतर पुन्हा घरकाम करून रात्रीच्या वेळी अभ्यास करणे... असा संघर्षमय प्रवास करून कोंडेगव्हाण (ता.श्रीगोंदा) येथील शारदा पवारने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले आहेत. आता पुढील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा मोठा अडसर आहे.

नगरपासून साठ किलोमीटर अंतरावर श्रीगोंदा तालुक्यात कोडेगव्हाण येथे राहणाऱ्या शारदा पवार हिच्या घरची परिस्थिती आर्थिक बेताची. आई अनिता, वडिल विलास पवार, भाऊ अभिषेक व आजी चंद्रकला अशा पाच जणांचे हे कुटुंब. शारदाची मोठी बहिण आश्विनीचे लग्न झालेले. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्याला धैर्याने सामोरे जात अनिता व विलास पवार हे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून त्यामधून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर संसाराचा गाडा चालवतात.

शारदा ही देखील शाळेला असणाऱ्या सुट्टीच्या दिवशी मजुरी करून संसाराला हातभार लावते. गावामध्ये भारनियमनाची समस्या असल्याने बहुतांश वेळी रात्रभर गावात वीज नसते. अशा परिस्थितीमध्ये प्रसंगी रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून खासगी क्लास नसताना शारदाने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवत निंबवी येथील भैरवनाथ विद्यालयात व्दितीय येण्याची किमया केली आहे. गणित व हिंदी विषयांत प्रत्येकी ९५ गुण मिळवत शारदा शाळेत विषयांत पहिली आली. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहतानाच गरिब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ध्येय तिला गाठायचे आहे. त्यासाठी मदत आहे ती दानशुरांच्या मदतीची.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज