अ‍ॅपशहर

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात, २ ठार

नाशिक-पुणे महामार्गावर कर्जुले पठार जवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्राधिकरण कार्यालयातील दोन कर्मचारी ठार झाले.

महाराष्ट्र टाइम्स 29 May 2019, 2:46 pm
अहमदनगर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tempo


नाशिक-पुणे महामार्गावर कर्जुले पठार जवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्राधिकरण कार्यालयातील दोन कर्मचारी ठार झाले. ते दोघे टेम्पोने पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी निघाले होते.

ठार झालेल्यापैंकी एक कर्मचाऱ्याचे नाव अनिल सोपान कोळी आहे. दुसऱ्याचे नाव समजू शकलेले नाही. या अपघातात अन्य चौघे जखमी झाले आहेत. हे सर्वजण संगमनेरहून पुण्याकडे निघाले होते. एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली. त्यामुळे टेम्पो उलटून हा अपघात झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज