अ‍ॅपशहर

राजीनाम्यानंतर अजित पवार अज्ञातस्थळी

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर 'नॉट रीचेबल' झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर मुक्काम केला. तेथून पहाटेच ते इतरत्र निघून गेले आहेत. मात्र, ते नेमके कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 2:22 pm
अहमदनगर: आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर 'नॉट रीचेबल' झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर मुक्काम केला. तेथून पहाटेच ते इतरत्र निघून गेले आहेत. मात्र, ते नेमके कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp leader ajit pawar not reachable after resignation
राजीनाम्यानंतर अजित पवार अज्ञातस्थळी


वाचा: कुटुंबात कोणताही वाद नाही: शरद पवार

राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवार अंबालिका कारखान्यावर आले. सोबत त्यांचे कारखाना व्यवसायातील भागीदार वीरधवल जगदाळे होते. त्यांच्या येथे येण्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. कारखान्यावर नेहमीच्या गेस्ट हाऊसवर न थांबता ते पूर्वी वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या एका बंगल्यात थांबले. त्यांच्या येथील मुक्कामाची माहिती बाहेर पडल्यानंतर पहाटेच ते येथुम दुसरीकडे निघून गेले. येथे कोणाला भेटणे आणि बोलणेही त्यांनी टाळले, नेहमीचे सहकारी, नेहमीचे वाहनही त्यांनी टाळले.

वाचा: अजित पवारांच्या राजीनाम्यामागचं कारण काय?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज