अ‍ॅपशहर

बचतगटांना मिळेना जागा

बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सरकारी पातळीवर होत असलेले प्रयत्न कमालीचे अपयशी होताना दिसत आहेत. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष होत असून त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंसाठी अजूनही हक्काचे विक्री केंद्र जिल्ह्यात सुरू झालेले नाही.

Maharashtra Times 6 Feb 2017, 1:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no space for self help group
बचतगटांना मिळेना जागा


बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सरकारी पातळीवर होत असलेले प्रयत्न कमालीचे अपयशी होताना दिसत आहेत. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष होत असून त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंसाठी अजूनही हक्काचे विक्री केंद्र जिल्ह्यात सुरू झालेले नाही. काही ठिकाणी केंद्राची इमारत बांधून तयार झाली असली तरी प्रत्यक्षात बचतगटांना दिलेली नाहीत. तर काही ठिकाणचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. अशा अडचणींमुळे पाच वर्षात एकही विक्री केंद्र सुरू झाले नसून बचतगटांची परवड होत आहे.

जिल्ह्यात तब्बल बारा हजार बचतगट स्थापन झाले आहेत. या बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. बचतगटांना त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू विकण्यासाठी हक्काची जागा असावी, या हेतूने जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आठ ठिकाणी केंद्र बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या केंद्रांची कामे केली जात होती. परंतु, पुढे केंद्रासाठी बांधकाम साहित्याची कमतरता व अन्य अडचणी वाढत गेल्याने ही कामे रखडली. तरीही अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सध्या अकोले, नेवासा, लोणी संवत्सर व पारनेर या पाच ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी लोणी येथे लवकरच केंद्र सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. इतर तालुक्यात केंद्रांचेही काम सुरू असून ही केंद्रे केव्हा सुरू होणार याबाबत निश्चित कोणीही सांगू शकत नाही.

चार हजार बचतगट बंद

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यात १९९९ सालापासून जिल्ह्यात १२ हजार ३४६ बचतगटांची नोंदणी केली आहे. या बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी ७ हजार ८९४ बचतगटांना आत्तापर्यंत जवळपास १४३ कोटी रुपये कर्जाचे वाटप केले आहे. असे असले तरी बंद पडलेल्या गटांचीही संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील ३ हजार ९९३ बचतगट बंद पडले असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज