अ‍ॅपशहर

नगरमध्ये कांद्यास ७५० रुपये बाजारभाव

Maharashtra Times 26 Aug 2016, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion rate crash
नगरमध्ये कांद्यास ७५० रुपये बाजारभाव

राज्यात सर्वत्र कांद्याचे भाव घसरत चालले असताना, नगरमध्येही कांदा कवडीमोल दराने विकला जाऊ लागला आहे. गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्यास क्विंटलमागे अवघा ७५० रुपये बाजारभाव मिळाला. एका किलोस साडेसात रुपयेच हातात पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले.

कांद्याच्या बाजारभावात सध्या घसरण होत आहे. बाजार समितीत लिलावासाठी आलेला कांदा व्यापाऱ्यांकडून भाव पाडून मागितला जात आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्यासही भाव मिळेनासे झाले आहेत. किरकोळ बाजारात मात्र हाच कांदा पंधरा ते वीस रुपये किलो दराने विकला जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र नुकसानच सहन करावे लागत आहे. गुरुवारी लिलावावेळी जिल्हाभरातून २१ हजार ८०९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात कांद्यास सरासरी ७५० ते ७७५ रुपये बाजारभाव मिळाला. अपेक्षेपेक्षा अतिशय कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी मात्र नाराज झाले. कांद्याचे पीक घेण्यासाठी होणारा खर्च जास्त असल्याने लिलावात नकसानच होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज