अ‍ॅपशहर

रेल्वेसाठी ऑनलाइन याचिका

नगरहून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू होण्यासाठी ऑनलाइन याचिका रेल्वे मंत्रालयात दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम online petition for railway
रेल्वेसाठी ऑनलाइन याचिका

नगरहून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू होण्यासाठी ऑनलाइन याचिका रेल्वे मंत्रालयात दाखल करण्यात आली आहे. दोन दिवसात या याचिकेला साडेतीन हजार पेक्षा जास्त जणांनी प्रतिसाद दिला असून, हजारावर नागरिकांनी त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून या रेल्वे मागणीस पाठिंबाही दर्शविला आहे.
नगर-पुणे रेल्वेसाठी कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी www.change.org या वेबसाइटवर ऑनलाइन याचिका रविवारी (ता. २३) सायंकाळी दाखल केली. त्यानंतर बुधवारपर्यंत (२६ ऑक्टोबर) एक हजारहून अधिक लोकांनी तिच्यावर ऑनलाइन सह्या केल्या आहेत. याशिवाय या याचिकेबाबत आपले मतही नोंदवले आहे. साडेतीन हजारांहून लोकांनी ही याचिका वाचली आहे. त्यात प्रतिष्ठितांसह सामान्यांचाही समावेश आहे. या याचिकेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक, पुणे व सोलापूर विभागांचे व्यवस्थापक यांच्याकडे नगर-पुणे रेल्वेची मागणी करण्यात आली आहे.
नगर-पुणेदरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीत वधवा यांच्यासह आर्किटेक्ट अर्शद शेख, नितीन थोरात, डॉ. संजय आसनानी, अशोक कानडे, एस. बी. रुणवाल, धनेश कोठारी, सय्यद साबिरअली, संजय सपकाळ, विपुल शहा, सुनील छाजेड, अजय दिघे, किरण भंडारी, जसमितसिंग वधवा, मिलिंद बेंडाळे, संतोष बडे आदींचा समावेश आहे. पुणे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने पुणे-नगर प्रवासाचा वेळ तीन तासांहून अधिक झाला आहे. अपघातांची संख्याही वाढत आहे. हा चौपदरी मार्ग कमी पडत असताना त्याचे अधिक रुंदीकरणही होण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत सध्याच्या रेल्वेमार्गावरच नगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची, वेळेची व आर्थिक बचतीसह सुरक्षित प्रवास करता येणार असल्याचा दावा ऑनलाइन याचिकेत करण्यात आला आहे. त्याला जगभरातील नगरकरांकडून प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज