अ‍ॅपशहर

सेंद्र‌िय शेती प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात पारंपरिक कृषी विकास योजना राबवली जात आहे. या योजनेत सेंद्र‌िय शेतीवर भर देण्यात आला आहे.

Maharashtra Times 10 Oct 2016, 3:00 am
नगर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात पारंपरिक कृषी विकास योजना राबवली जात आहे. या योजनेत सेंद्र‌िय शेतीवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ३८ गावांची निवड करण्यात आली असून जवळपास १ हजार ८०० शेतकऱ्यांनी कामे सुरू केली आहेत, अशी माहिती आत्मा विभागातून देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम organic farming project implemention
सेंद्र‌िय शेती प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

या योजनेत कृषी विभागाने सेंद्र‌िय शेतीचे गट तयार केले आहेत. प्रशिक्षण दिल्यानंतर या पद्धतीने शेती केली जात आहे. या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या भागाचे प्रमाणीकरण केले जाणार आहे. या योजनेत हिवरेबाजार, तांदळी वडगाव, देऊळगाव सिद्धी (ता. नगर), गुणोरे, वाडेगव्हाण, राळेगणसिद्धी (ता. पारनेर), मोहोज खुर्द, पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी), परीटवाडी, रूईगव्हाण, डिकसळ (ता. कर्जत), पिंपळगाव, जायभायवाडी, लेहनेवाडी (ता. जामखेड), लोणी, चोराचीवाडी (ता. श्रीगोंदा), गोंधवणी, माळवडगाव (ता. श्रीरामपूर), पुनतगाव, वडाळा, वाकडी (ता. नेवासा), कांबी, वाघोली (ता. शेवगाव), शेरी चिखलठाण, चिंचविहीरे (ता. राहुरी), पिंप्री लौकी, निमगाव पागा, पेमगिरी, सांगवी (ता. संगमनेर), वाशेरे, शिरपुंजे, धामनवण, शेंडी (ता. अकोले), हनुमंतगा, राजुरी (ता. राहता), धामोरी, जेऊर, कुंभारी, तळेगाव मळे (ता. कोपरगाव) या गावांची निवड करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज