अ‍ॅपशहर

राहुरीत सेंद्रिय शेती संशोधन केंद्र

जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील उर्वरीत तीन कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास कृषी विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Maharashtra Times 26 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम organic farming research center in rahuri
राहुरीत सेंद्रिय शेती संशोधन केंद्र

जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील उर्वरीत तीन कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास कृषी विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विद्यापीठांत केंद्र स्थापन करण्यासाठी मुलभूत सुविधा निर्मिती, प्रयोगशाळेसाठी आवश्यक उपकरणे, सेंद्रिय शेतीसाठी औजारे, सिंचन सुविधा या बाबींसाठी प्रत्येक विद्यापीठास पाच कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. या निधीतून विद्यापीठांनी सुविधा निर्माण
करायच्या आहेत.
शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. रासायनिक किटकनाशक आणि बुरशीनाशकांचाही वापर वाढला आहे. तर दुसरीकडे सिंचनाचा अयोग्य वापर, हवामानातील बदल, अपुरा पाऊस अशा समस्या जाणवत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन व उत्पादकता घटत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या परिस्थितीत शेती व्यवसाय कार्यक्षम करण्यासाठी सेंद्रिय शेती विषयक सुधारीत तंत्रज्ञान विकसित करुन त्याचा प्रसार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या चार विद्यापीठांत सेंद्रिय शेती संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार केंद्र स्थापन केले जाणार असून यासाठी पदे निर्मिती केली जाणार आहे. तसेच केंद्रात आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहे. या कामांसाठी वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यापीठासाठी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज