अ‍ॅपशहर

सहा पंचायतीत सौरवीज

जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांना सोलरद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. या कामासाठी टेंडर मिळाले असून टेंडर ओपन करुन कामास सुरुवात केली जाणार आहे.

Maharashtra Times 27 Feb 2017, 4:38 am
टेंडर अंतिम टप्प्यात; आठवडाभरात कामास सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panchayat
सहा पंचायतीत सौरवीज


म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांना सोलरद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. या कामासाठी टेंडर मिळाले असून टेंडर ओपन करुन कामास सुरुवात केली जाणार आहे. आचारसंहिता शिथील झाल्याने अडचणी संपल्या आहेत. या संपूर्ण कामासाठी जिल्हा नियोजन समितीने १ कोटी ८ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात शेवगाव, नगर, पारनेर, जामखेड, पाथर्डी, राहुरी या सहा पंचायत समित्यांची कामे सुरू केली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात या सहा पंचायत समित्या निवडल्या होत्या. या कामासाठी निधी मंजूर झाला तसेच ई टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्यानंतर मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर झाल्याने काम रखडले होते. आता मात्र निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथील झाली असून प्रशासकीय कामकाजाने वेग घेतला आहे. येत्या दोन दिवसांत टेंडर ओपन करुन कमी किमतीच्या निविदेस मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पंचायत समित्या लवकरच विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत. उर्वरीत आठ पंचायत समित्यांच्या कामास दुसऱ्या टप्प्यात सुरुवात केली जाणार आहे.

झेडपी अजूनही अंधारात

पंचायत समित्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी शहरातील जिल्हा परिषद मुख्यालयातील सोलर प्रोजेक्टचे काम मात्र रखडले आहे. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने अद्याप टेंडर प्रसिद्ध झालेले नाही. यातील अडचणी दूर करुन टेंडर ऑनलाइन प्रसिद्ध केले जाणार आहे. या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. इमारतीत विजेची पर्यायी व्यवस्था नसल्याने लाइट गेल्यानंतर सर्वच कामकाज ठप्प होते. दर शनिवारी लाइट जात असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना काहीच काम करता येत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज