अ‍ॅपशहर

अल्कोहोल पुरवणाऱ्याला अटक

‘दारूनिर्मितीसाठी अल्कोहोलचा पुरवठा करत होतो. दर तीन महिन्यांनी आरोपी अल्कोहोल घेऊन जात होता’, अशी कबुली मद्यसम्राट दादा वाणी याने पोलिसांना दिली आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pangarmal alcohol
अल्कोहोल पुरवणाऱ्याला अटक


‘बनावट दारूप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना दारूनिर्मितीसाठी अल्कोहोलचा पुरवठा करत होतो. दर तीन महिन्यांनी आरोपी अल्कोहोल घेऊन जात होता’, अशी कबुली बनावट दारूनिर्मितीचा मद्यसम्राट दादा वाणी याने पोलिसांना तपासात दिली आहे. नाशिक कारागृहातून दादा वाणीला नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी भरत जोशी याने शिरपूर (धुळे) येथून प्रवीण भालचंद्र उर्फ दादा वाणी याच्याकडून अल्कोहोलचा पुरवठा होत होता, अशी कबुली दिली होती. त्यामुळे दादा वाणीला अटक करून तपास करण्याचा आवश्यकता पोलिसांना होती. धुळ्यातील बनावट मद्यनिर्मितीप्रकरणी दादा वाणी हा अटकेत असून, त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले. या आरोपींना नगरच्या पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. आरोपी जोशीच्या घरात सापडलेले बॅरेल वाणी याला दाखविल्यानंतर वाणी याने पोलिसांना काही माहिती दिली आहे. आरोपी भरत जोशी हा अल्कोहोल घेऊन जात होता. तीन महिन्यांतून एकदा ४०० लिटर अल्कोहोल प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये घेऊन जात होता. आरोपीने अनेकवेळा अल्कोहोल नेले आहे. हे अल्कोहोल वाहण्यासाठी पिक-अप वाहनाचा वापर केला जात होता, अशी माहिती पोलिस तपासात वाणी याने दिली आहे. या आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक असलेल्या मंगल आव्हाड व तिच्या पतीने प्रचार करत असताना भीमराज आव्हाड यानेच दारू आणली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. दारू भरण्यासाठी दमण येथून मोकळ्या बाटल्या कुरिअरद्वारे आणल्या जात होत्या. त्या कुरिअरवाल्याकडे चौकशी करून पोलिसांनी याबाबत कागदपत्रेही हस्तगत केली आहेत.

दारूत टाकण्यात येत असलेल्या रंगाबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आरोपी मोहन दुग्गल याने शुक्रवारी खाद्यपदार्थाचे रंग विकत घेतले जात असलेले दुकान पोलिसांना दाखविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज