अ‍ॅपशहर

रस्ते दुरुस्ती काम पाडले बंद

मोहरममुळे शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेले रस्ते पॅचिंगचे काम वादात सापडले आहे. माळीवाड्याजवळील पंचपीर चावडीजवळ सुरू असलेल्या या कामास परिसरातील नागरिकांनीच आक्षेप घेतला.

Maharashtra Times 29 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम people closed road repairs works
रस्ते दुरुस्ती काम पाडले बंद

मोहरममुळे शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेले रस्ते पॅचिंगचे काम वादात सापडले आहे. माळीवाड्याजवळील पंचपीर चावडीजवळ सुरू असलेल्या या कामास परिसरातील नागरिकांनीच आक्षेप घेतला. त्यामुळे मनपाचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी संबंधित काम थांबवून त्यासाठी आलेल्या रोलर व अन्य गाड्या रस्त्याच्या कडेला लावून टाकल्या. या परिसरात फेज-२ पाइपलाइनचे काम झाले असल्याने खड्डे दुरुस्तीला अडचणी येत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
नगरमध्ये येत्या शनिवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी मोहरमची ‘कत्तल की रात’ची मिरवणूक निघणार आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (१ ऑक्टोबर) दुपारी मोहरम सवाऱ्यांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. हे दोन्ही मिरवणूक मार्ग कोठला, मंगलगेट, रामचंद्र खुंट, पारशा खुंट, आडते बाजार, कापड बाजार, जुना बाजार, पंचपीर चावडी, जुनी महापालिका, दिल्लीगेट या परिसरातील आहेत. शहराच्या मध्यवस्तीतील या भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, हे काम निकृष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खड्ड्यांमध्ये मुरुम व खडी टाकून रोलिंग केल्यावर त्यावर बारीक खडी टाकली जात आहे. या रस्त्यांवर वाहनांची सतत वर्दळ असल्याने बारीक खडी मोकळी होऊन रस्त्यावर पसरली असून, तिच्यामुळे धुळ वाढली आहे. तसेच खड्ड्यात टाकलेल्या मोठ्या खडीमुळे चालणारांच्या पायांना इजा होऊ लागली आहे. त्यामुळे पंचपीर चावडीवर सुरू असलेले हे काम परिसरातील नागरिकांनीच बंद पाडले. त्यानंतर बोराटेंनीही तेथे येऊन काम करण्यास मनाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज