अ‍ॅपशहर

जिल्ह्यात पाझर तलाव पुनरुज्जीवनाची मागणी

राज्यात १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

Maharashtra Times 6 May 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम percolation lake
जिल्ह्यात पाझर तलाव पुनरुज्जीवनाची मागणी


राज्यात १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष प्रेमसुख लोढा यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीचे पत्रही त्यांनी पाठवले आहे.
महाराष्ट्रात १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती सध्याच्या दुष्काळात दिसू लागली आहे. पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे. १९७२मध्ये दुष्काळी कामे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावात पाझर तलावांची कामे केली गेली आहेत. नगर जिल्हा दुष्काळी जिल्हा असल्याने पाझर तलाव व गाव तलावाची कामेही त्या वेळी येथे झाली आहेत. सुमारे ३५ वर्षांपूर्वी पागे व अन्य योजनांद्वारे झालेली ही कामे आजही अस्तित्वात आहेत. मात्र, या तलावांमध्ये माती व गाळ जमा झाला असल्याने त्याची खोली कमी होऊन पाणी साठवण क्षमताही घटली आहे. त्यामुळे या तलावांतील पाण्याचा फायदा परिसरातील विहिरींना होत नसल्याने गावोगावी टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे.
भविष्यात पुन्हा अशी स्थिती होऊ नये म्हणून १९७२च्या दुष्काळात रोहयोतून झालेल्या पाझर व गाव तलावांतील गाळ व माती काढण्याचे काम पुन्हा रोहोयो वा अन्य योजनेतून घेतले गेले तर रोजगार हमीच्या कामगारांना रोजगारही उपलब्ध होईल व पाझर तलावांचा गाळ निघून त्यांची साठवण क्षमताही वाढणार आहे.त्यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही लोढा यांनी या पत्रात मुख्यमंत्र्यांना केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज