अ‍ॅपशहर

श्रीपाद छिंदमच्या निवडीला कोर्टात आव्हान

नगरसेवक म्हणून निवडून आलेला श्रीपाद छिंदम याची निवड रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धा उमेदवार नीलेश म्हसे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 13 Dec 2018, 5:35 pm
अहमदनगरः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shripad-chindam


अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजय झालेला वादग्रस्त श्रीपाद छिंदम याच्या निवडीला जिल्हा न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. प्रतिस्पर्धा उमेदवार नीलेश म्हसे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

निवडणुकीवेळी छिंदमच्या उमेदवारी अर्जातील ज्ञुटींवर म्हसे यांनी आक्षेप घेतला होता. हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता. त्याविरोधात आता म्हसे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, श्रीपाद छिंदम व इतर सात उमेदवांना प्रतिवादी करून आज याचिका आज दाखल केली आहे. या याचिकेमध्ये छिंदमची अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरकसेवकपदी झालेली निवड सदोष निवडणूक प्रक्रियेतून झालेली असल्यामुळे छिंदम याची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज