अ‍ॅपशहर

लोणीत पूर्वीपासूनच प्लास्टिकबंदी

लोणी (ता. राहाता) गावात प्लास्टिक बंदीचा निर्णय पूर्वीच घेतलेला आहे. याच भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही झालेली आहे.

Maharashtra Times 19 Mar 2018, 3:23 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम plastic banned in loni
लोणीत पूर्वीपासूनच प्लास्टिकबंदी


लोणी (ता. राहाता) गावात प्लास्टिक बंदीचा निर्णय पूर्वीच घेतलेला आहे. याच भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही झालेली आहे. आता राज्य सरकारनेच हा निर्णय घेतल्याने गावातही कडक कारवाई करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला लोणी बुद्रुकमध्ये ग्रामसभा झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. सरपंच लक्ष्मण बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे, भगवंत विखे, किसनराव विखे, अनिल विखे, उपसरपंच अनिल विखे, भाऊसाहेब विखे यांच्यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याच ठरले. गावातील कोणताही विक्रेता, दुकानदार किंवा आठवडे बाजारात प्लास्टिक पिशवी आढळल्यास पाच हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामपंचायतीचा कर न भरणाऱ्यांकडूनही व्याज व दंड वसूल करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच गावातील आदिवासी व मागासवर्गीयांचा घरकुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही अनिल विखे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज