अ‍ॅपशहर

नगरः पोलिसांच्या छाप्यात दोन तलवारींसह अंबर दिवा जप्त, एकाला अटक

कर्जत तालुक्यात पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केलीय. या छाप्यात पोलिसांनी दोन तलवारींसह नारंगी रंगाचा अंबर दिवाही जप्त केल आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तू सकट याला अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2020, 2:17 am
म. टा. प्रतिनिधी, नगरः कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वर येथील एका वस्तीवर छापा टाकत पोलिसांनी दोन तलवारीसह एक नारंगी रंगाचा अंबर दिवा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तू मुरलीधर सकट (रा.सपकाळवस्ती, टाकळी खंडेश्वर, ता.कर्जत) याला अटक केली आहे. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, आरोपीने अंबर दिव्याचा व घातक शस्त्राचा वापर करून आणखी काही गुन्हे केले आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ahmednagar arrest
नगरः पोलिसांच्या छाप्यात दोन तलवारींसह अंबर दिवा जप्त, एकाला अटक


पोलीस अधिकारी जाधव हे रात्रगस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की दत्तू सकट याने आपल्या घरात व वाहनात विनापरवाना बेकायदा दोन घातक लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या आहेत. त्यानंतर जाधव यांनी तत्काळ त्यांच्याकडील पोलीस पथक बोलावून टाकळी गावात वस्तीवर जाऊन सकट याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घराची आणि दारासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीची (एमएच १६ आर ४१३३) झडती घेतली. यावेळी गाडीमध्ये एक लोखंडी तलवार आणि एक नारंगी रंगाचा अंबर दिवा असा मुद्देमाल मिळाला. तर आरोपी सकट याच्या घरामध्येही एक तलवार मिळून आली आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी दत्तू सकट यास अटक केली आहे. तसेच आरोपीच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरा गांधी हतबल असताना महाराष्ट्रात झाला होता राजकीय भूकंप!

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्यासह त्यांच्या पथकातील गौतम फुंदे, केशव व्हरकटे, हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, संतोष साबळे, मच्छीद्र जाधव, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे यांनी ही कारवाई केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज