अ‍ॅपशहर

घेरावापूर्वीच आंदोलक ताब्यात

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदनापासून रोखण्यासाठी निघालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी ताब्यात घेतले.

Maharashtra Times 17 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police stoped protesters
घेरावापूर्वीच आंदोलक ताब्यात


स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदनापासून रोखण्यासाठी निघालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी ताब्यात घेतले. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय मैदानावर कोणताही अडथळा न येता ध्वजवंदन पार पडले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करू देणार नाही, असा पवित्रा सुकाणू समिती, प्रहार संघटना, हमाल पंचायत, अशा विविध संघटनांनी घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलिस मुख्यालय मैदानाच्या समोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हे कार्यकर्ते पोलिस मुख्यालय मैदानाच्या प्रवेशद्वारातून ध्वजवंदनाच्या दिशेने निघाले. त्या वेळी पोलिसांनी प्रवेशद्वारावर आंदोलकांना रोखले व ध्वजवंदनात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सुकाणू समितीचे अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज