अ‍ॅपशहर

‘अतिक्रमण’ला मिळेना बंदोबस्त

मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवार (२२ ऑगस्ट) रोजी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने ठप्प झाली.

Maharashtra Times 29 Aug 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police unable
‘अतिक्रमण’ला मिळेना बंदोबस्त

मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवार (२२ ऑगस्ट) रोजी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने ठप्प झाली. त्यातच मनपाला चौथा शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या आल्याने तीन दिवसांपासून ही मोहीम बंद असल्याने याचा फायदा छोट्या विक्रेत्यांनी घेत पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटली. उद्या सोमवारी (२९ ऑगस्ट) पोलिस बंदोबस्त मिळण्यावर या मोहिमेचे भवितव्य अवलंबून आहे.
शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर ती काही दिवसांमध्ये लगेच बंद केली जाते, असा अनुभव आहे. त्यामुळे शहरासह उपनगरामध्ये अतिक्रमणाची समस्या कायम आहे. उत्सव काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरामध्ये सलग पंधरा दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २२ ऑगस्टपासून पत्रकार चौकातून ही मोहीम सुरू झाली. गुरुवारपर्यंत अपुऱ्या पोलिस बंदोबस्तावर काम करीत सावेडी उपनगरासह मध्यवर्ती शहरातील काही भागातील अतिक्रमण हटवली. शुक्रवारी मात्र अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने ही मोहीम बंद पडली. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी आल्याने सलग तीन दिवस मोहीम बंद राहिली. आता उद्या सोमवारपासून ही मोहीम पुन्हा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन असले तरी मोहीम राबविताना अतिक्रमणधारकांशी वादविवाद होत असल्याने पोलिसांची उपस्थिती आवश्यक असते. आता गणेशोत्सव तोंडावर आल्याने पोलिसांमागे सार्वजनिक गणेश मंडळांना परवाने व अन्य बंदोबस्त कामे असल्याने मनपाच्या मोहिमेला बंदोबस्त कमी मिळण्य़ाची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज