अ‍ॅपशहर

राष्ट्रीय कौन्सिलवर पोपटराव पवार

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण कौन्सिलवर आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कौन्सिलद्वारे ग्रामीण विद्यापीठ शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांच्या कामकाजाबाबत सरकारला सल्ला देण्याचे काम केले जाते.

Maharashtra Times 20 Mar 2017, 3:00 am
नगर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण कौन्सिलवर आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कौन्सिलद्वारे ग्रामीण विद्यापीठ शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांच्या कामकाजाबाबत सरकारला सल्ला देण्याचे काम केले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम popatrao pawar on national council
राष्ट्रीय कौन्सिलवर पोपटराव पवार

आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये (ता. नगर) लोकसहभागातून ग्रामविकासाचे मॉडेल घडविणारे सरपंच पोपटराव पवार यांनी राज्य सरकारच्या आदर्शगाव योजना कार्य समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून राज्यातील १०० गावे आदर्श करण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी तब्बल सुमारे २५ गावे अंतिम टप्प्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांची आता राष्ट्रीय ग्रामीण कौन्सिलवर नियुक्ती झाल्याने देशातील ग्रामीण विकासाच्या कामात योगदान देण्याची संधी त्यांना मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्नकुमार हे राष्ट्रीय ग्रामीण कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. ग्रामीण विद्यापीठ शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांना विद्यापीठ अनुदानावर एनसीसी, एनएसएस, ग्रामीण उद्योजकता, नॅक, आयएमएस, कृषी व तंत्र शिक्षण याबाबत ही समिती सरकारला सल्ला देण्याचे काम करते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज