अ‍ॅपशहर

बसस्थानकावर खासगी वाहनांना ‘नो एंट्री’

शहरातील बसस्थानकांच्या आवारात खासगी वाहनांचा वावर वाढल्याने बसस्थानकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी एसटी चालक व इतर वाहन चालकांचे वाद सातत्याने होत आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बसस्थानकांच्या आवारात खासगी वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Times 19 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम private bus vehicles no entry
बसस्थानकावर खासगी वाहनांना ‘नो एंट्री’

शहरातील बसस्थानकांच्या आवारात खासगी वाहनांचा वावर वाढल्याने बसस्थानकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी एसटी चालक व इतर वाहन चालकांचे वाद सातत्याने होत आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बसस्थानकांच्या आवारात खासगी वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी तारकपूर बसस्थानकात सुरू झाली असून वाहने आत येऊ नयेत, यासाठी बसस्थानकाच्या गेटवरच सुरक्षा नियुक्त केले आहेत. बसस्थानकांच्या आवारातील या बेकायदेशीर पार्किंगची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बसस्थानकाची पाहणी केली.
शहरात माळीवाडा, स्वस्तिक व तारकपूर ही तीन बसस्थानके आहेत. तीनही बसस्थानकांना अवैध प्रवासी वाहने आणि खासगी वाहनांचा गराडा पडलेला असतो. बसस्थानकाच्या आवारातच वाहने पार्क केली जातात. त्यामुळे या पार्किंगमधून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागते. बऱ्याचदा चालकांचे रिक्षाचालकांशी वादही होतात.
माळीवाडा बसस्थानकात ही समस्या गंभीर बनली असून येथे तर दिवसाआड वादाच्या घटना घडत असतात. बसस्थानकाच्या दोनशे मीटर परिसरात खासगी वाहने लावण्यास मनाई असतानाही या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी बसस्थानकाची पाहणी केली. येथे खासगी वाहने येऊ नयेत यासाठी सुरक्षारक्षकांना गेटवरच उभे करण्यात आले आहे. त्यांच्याकडून खासगी वाहनांना आत प्रवेश करण्यापासून रोखले जात असले तरी आवाराच्या आतच उभ्या असलेल्या रिक्षांवर मात्र काहीच कारवाई झालेली नाही. या रिक्षा आजही बसस्थानकाच्या आतच उभ्या आहेत. पुढील टप्प्यात माळीवाडा व स्वस्तिक बसस्थानकातही अशाच पद्धतीने कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज