अ‍ॅपशहर

पुतळ्यांना संरक्षण देण्याची आरपीआयची मागणी

देशातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करुन, जातीय तेढ निर्माण करुन अराजकता माजविणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी तसेच पुतळ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.

Maharashtra Times 10 Mar 2018, 3:00 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम provide protection to statue seeks rpi
पुतळ्यांना संरक्षण देण्याची आरपीआयची मागणी


देशातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करुन, जातीय तेढ निर्माण करुन अराजकता माजविणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी तसेच पुतळ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.

देशातील काही भागात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रकार घडले आहेत. समाजकंटकांच्या या कृत्याने देशात जातीय तेढ, अराजकता, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न असून या समाजकंटकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागील मुख्य सूत्रधारांचाही शोध घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. यावेळी आरपीआय भिंगार युवक आघाडीचे शहराध्यक्ष अमित काळे, नाना पाटोळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, मंगेश मोकळ, कैलास पगारे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, सचिन भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, संदिप वाघचौरे, प्रकाश भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, भिमराव कांबळे, दादासाहेब पाडळे, सुरेंद्र थोरात आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज