अ‍ॅपशहर

पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

मुकुंदनगर येथील नगरसेवक समद खान यांचा अंडा गँगशी संबंध नसताना पोलिस प्रशासनाला खोटे निवेदन देऊन दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मुकुंदनगर भागातील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

Maharashtra Times 12 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public march on district police office in nagar
पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा


मुकुंदनगर येथील नगरसेवक समद खान यांचा अंडा गँगशी संबंध नसताना पोलिस प्रशासनाला खोटे निवेदन देऊन दिशाभूल करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मुकुंदनगर भागातील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नगरसेवक खान एका फौजदारी गुन्ह्यात दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच काही लोकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन समद खान यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. खान यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी काही मोठ्या राजकीय मंडळीच्या इशार्यावर त्यांच्या विरोधात खोटे आरोप करून अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे खोटे निवेदन देऊन पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. अन्यथा पूर्वसूचना न देता औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज