अ‍ॅपशहर

साई मंदिर परिसरात फुल विक्रीबाबात मोठा निर्णय, करोना काळात घेतलेला निर्णय अद्याप कायम होता

Ahmednagar News : शिर्डीतील साई मंदिरात प्रसाद आणि फुल विक्रीवरून मोठा वाद सुरू आहे. आता याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत फुल विक्री पुन्हा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2023, 8:38 am
शिर्डी, अहमदनगर : करोना काळात साई मंदिरात फुलं, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही संस्थानने ही बंदी कायम ठेवल्याने फुल, प्रसाद विक्रेत्यांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता येत्या १० दिवसांत साई मंदिराजवळ शेतकऱ्यांमार्फत फुल विक्री केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sai baba mandir
साई मंदिर परिसरात फुल विक्रीबाबात मोठा निर्णय, करोना काळात घेतलेला निर्णय अद्याप कायम होता


गेल्या काही महिन्यांपूर्वी फुल, प्रसाद विक्रेत्यांनी साई मंदिरात फुल हार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. बराच गोंधळ झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेऊन जिल्हास्तरीय समिती गठित करून त्यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. शिर्डी येथील फुलविक्री बाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. पुढील दहा दिवसांत संस्थानमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल, असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय.


राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थान दर्शनरांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल, पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी. शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडीग सेवा सुरू होणार आहे‌‌. सव्वा पाचशे कोटींच्या नवीन टर्मिनस इमारतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विमानतळावर एकाचवेळी दहा विमाने थांबतील. याचबरोबर समृद्धी महामार्गामुळे आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डीच्या उत्पन्नात भर पडणार आहे‌, अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हजार रुपयात एक ब्रास वाळू, नव्या धोरणामुळे तस्करी हद्दपार, खडीच्या धोरणाबाबतही विखेंचे संकेत
शेतकऱ्यांना घरपोच वाळू

सरकारी वाळू लिलाव बंद करण्यात येऊन शेतकऱ्यांना घरपोच जागेवरच ६०० रूपये ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. यातून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पाणंद व शिवरस्ते मोकळे करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत रोव्हर तंत्रज्ञानाने मोजणी करून शेतकऱ्यांना नकाशा प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे, असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज