नगर : 'करोना'ग्रस्तांच्या उपचार आणि उपाययोजनांसाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपले दोन महिन्यांचे मानधन देणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीत ही रक्कम जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. करोना विषाणूचा प्रसार ही राष्ट्रीय अपत्ती आहे. त्यामुळे या विरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. याची सुरुवात स्वत:पासून करावी या उद्देशाने आपण हा निर्णय घेत असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.
राधाकृष्ण विखे देणार दोन महिन्यांचे मानधन
'करोना'ग्रस्तांच्या उपचार आणि उपाययोजनांसाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपले दोन महिन्यांचे मानधन देणार आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2020, 4:00 am