अ‍ॅपशहर

रघुवीर खेडकर यांना जीवनसाधना पुरस्कार

लोककलेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात संगमनेरचे नाव गाजविणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कलाभूषण रघुवीर खेडकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

Maharashtra Times 6 Feb 2018, 2:58 pm
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raghuveer khedkar received jeevansadhana award
रघुवीर खेडकर यांना जीवनसाधना पुरस्कार


लोककलेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात संगमनेरचे नाव गाजविणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कलाभूषण रघुवीर खेडकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी नुकतीच ही घोषणा केली. येत्या १० फेब्रुवारी (शनिवार) रोजी विद्यापीठात होणाऱ्या विशेष समारंभात खेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मागील चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. आपली आई कांताबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा मंडळाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळीत आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्षही आहेत. उत्तम सोंगाड्या म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी दिल्ली येथे तमाशा सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. चंदिगड येथे संगीत नाटक अकादमी, मुंबई विद्यापीठ येथेही त्यांनी तमाशा सादर केला आहे. एक प्रयोगशील तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज