अ‍ॅपशहर

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

नगर शहरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला बेवारस स्थितीत फेकून देण्याची घटना शुक्रवारी घडली. ही मुलगी गंभीर जखमी अवस्थेच शुक्रवारी सकाळी सापडली.

Maharashtra Times 10 Dec 2016, 3:00 am
नगर ः नगर शहरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला बेवारस स्थितीत फेकून देण्याची घटना शुक्रवारी घडली. ही मुलगी गंभीर जखमी अवस्थेच शुक्रवारी सकाळी सापडली. या मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मुलीची उशीरापर्यंत ओळख पटलेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape on minor in nagar
अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार


केडगाव एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी एक लहान मुलगी पोलिस कर्मचाऱ्याला जखमी अवस्थेत बेवारस स्थितीत आढळून आली. या मुलीच्या तोंडावर, डोळ्यावर गंभीर जखमा आहेत. या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल येथील डॉक्टरांनी दिला. त्या नुसार पुढील उपचारासाठी या मुलीला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. या मुलीची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीची ओळख पोलिसांना पटलेली नसून, तिच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर ग्लोबल स्कूल, राहुरी असे लिहिलेले आहे. त्या दृष्टीने पोलिस शोध घेत आहेत. या चिमुरडीच्या चेहऱ्यावर असलेल्या मारहाणीवरून आरोपीने बलात्कार करून तिच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीची ओळख पटल्यानंतर आरोपीचा शोध पोलिसांना घेता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज