वाडिया पार्कमध्ये सकाळी फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील चार तोळे सोन्याच्या वजनाची चैन दोन चोरट्यांनी हिसकावून नेली. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशोक शंकरराव साय़ंबर (वय ६४ रा. रवीश सोसायटी, कायनेटिक चौक) यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. सायंबर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाडिया पार्क येथे फिरण्यासाठी आले होते. बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागे लघुशंकेसाठी ते गेले होते. त्या वेळी त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोघे जण आले. त्यातील एकाने त्यांना जमिनीवर ढकलून दिले, तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली.
ज्येष्ठाला लुटले
वाडिया पार्कमध्ये सकाळी फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील चार तोळे सोन्याच्या वजनाची चैन दोन चोरट्यांनी हिसकावून नेली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2020, 4:00 am