अ‍ॅपशहर

श्रीगोंदा रेल्वेस्थानकाजवळ एक्स्प्रेसवर दरोडा

पुण्याकडून दिल्लीला जात असलेली जम्मू-तावी (झेलम) एक्सप्रेस श्रीगोंदा येथे थांबवून चोरट्यांनी तीन प्रवाशांकडील मोबाइल, सोन्याचे दागिने असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

Maharashtra Times 6 Dec 2017, 6:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम roberry on express train near shrigonda
श्रीगोंदा रेल्वेस्थानकाजवळ एक्स्प्रेसवर दरोडा


पुण्याकडून दिल्लीला जात असलेली जम्मू-तावी (झेलम) एक्सप्रेस श्रीगोंदा येथे थांबवून चोरट्यांनी तीन प्रवाशांकडील मोबाइल, सोन्याचे दागिने असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून, याप्रकरणी नगरच्या रेल्वे पोलिस स्टेशनला तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जम्मू-तावी एक्सप्रेस रात्री दौंड स्टेशन येथून श्रीगोंदा रेल्वे स्टेशनकडे येत होती. श्रीगोंदा रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर चोरट्यांनी रेल्वेच्या डब्यांवर दगडफेक केली. त्याचवेळी ही रेल्वे थांबली होती. त्यावेळी एका डब्यात बसलेल्या आर. बी. दास (पुणे) यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोन्याची चेन व हातातील घड्याळ चोरट्याने हिसकावून नेले. तर याच डब्यातील वैशाली हेमराज हेगडे (जळगाव) व राणी खान बाबू खान (रा. गोल्हेर, मध्यप्रदेश) यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना दास यांनी रेल्वे प्रशासनाला सांगितल्यानंतर सोमवारी रात्री नगरच्या रेल्वे पोलिस स्टेशनला तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीत एक लाख १३ हजार रुपयांचा एेवज चोरट्यांनी लंपास केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक लुईस मकासरे व रेल्वे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज