अ‍ॅपशहर

'पवार कुटुंबियांचं ठरलंय', प्रवीण दरेकरांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

राज्यात आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता प्रवीण दरेकर आणि रोहित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2022, 11:37 am
अहमदनगर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा लगावला होता. त्यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पवार यांना उत्तर दिले. त्याला पवार यांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोघांचा चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येते. ‘दरेकर यांनी पवार कुटुंबियांची चिंता करू नये, आमचं ठरलंय’, असे पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar on Praveen Darekar


जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार पवार म्हणाले होते की, ‘२०१४ चे खरे मुख्यमंत्री भाजप नेते गोपीनाथ मुंडे होते. जर आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती.’ त्यांना उत्तर देताना दरेकर म्हणाले, ‘रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी. आधी त्यांच्या घरातील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवावं. उगीच वाद निर्माण करू नये. अजित पवार सांगतात ते रोहित पवारांनी लक्षात घ्यावं,’ असंही दरेकर म्हणाले.

Mumbai Monsoon 2022 : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? पावसाचं स्वरुप कसं असेल ?
आता पवार यांनी दरेकर यांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलीकडं असतं. तसंच कर्तृत्व स्व. मुंडे यांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं स्व. मुंडेंविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर यांनी स्वागत करायला हवं होतं. परंतु, तसं न करता उलट त्यांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली. हे आश्चर्यकारक आहे.'

'कदाचित मुंडे यांच्या निधनानंतर दरेकर भाजपमध्ये आल्याने त्यांना मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार', असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज