अ‍ॅपशहर

'अहिरांकडून पक्ष व लोकांचा विश्वासघात'

​​'राष्ट्रवादी काँग्रेसने पद आणि ताकद देऊनही माजी मंत्री सचिन अहिर यांनी पक्ष आणि लोकांना खरी गरज असताना पक्षांतर केले. हा पक्षासोबतच लोकांचाही विश्वासघात आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2019, 4:00 am
नगर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin ahir betrayal the faith of people rohit pawar
'अहिरांकडून पक्ष व लोकांचा विश्वासघात'


'राष्ट्रवादी काँग्रेसने पद आणि ताकद देऊनही माजी मंत्री सचिन अहिर यांनी पक्ष आणि लोकांना खरी गरज असताना पक्षांतर केले. हा पक्षासोबतच लोकांचाही विश्वासघात आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी

व्यक्त केली. पवार गुरुवारी पक्षाच्या मुलाखतीसाठी नगरला आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सध्या विरोधी पक्षात आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, कारण ते लोकांसोबत आहेत. तर सत्ताधारी पक्ष लोकांपासून दूर गेलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांचा तो हक्कही आहे. अशावेळी जर कोणी पक्ष सोडून जात असेल तर तो त्यांचा केवळ स्वार्थ असतो. अहिर यांना पक्षाने पद दिले, ताकद दिली. आता लोकांना आणि पक्षाला गरज असताना, निर्धाराने लढण्याचे सोडून त्यांनी पक्षांतर करणे हा त्यांचा स्वार्थी विचार असून त्यांनी पक्ष आणि लोकांचाही विश्वासघात केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते याबद्दलअधिक बोलतील.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज