अ‍ॅपशहर

सचिन चौधरीने केला गोळीबाराचा बनाव

श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील भाजप कार्यकर्ते सचिन चौधरी यांच्यावर झालेला गोळीबार हा बनाव असल्याचे उघड झाले आहे.

Maharashtra Times 26 Mar 2017, 3:00 am
श्रीगोंदे : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील भाजप कार्यकर्ते सचिन चौधरी यांच्यावर झालेला गोळीबार हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी चौधरी यानीच हा बनाव केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin chaudhary fek firing
सचिन चौधरीने केला गोळीबाराचा बनाव

२३ मार्चच्या रात्री दोन वाजनेच्या सुमारास आपल्यावर दोन ते तीन लोकांनी गोळीबार केल्याची फिर्याद भाजप कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी दिली होती. गोळीबाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी आबासाहेब झावरे, राहुल मोदळे, शिवलिंग लोंढे, दादाराम म्हस्के या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजापूर येथील घटना स्थळाची कसून पाहणी केली असता तेथे त्यांना बिअरची एक फुटलेली बाटली व बाजूलाच रक्ताने माखलेला काचेचा तुकडा आढळून आला.
पोलिस पथकाने दवाखान्यात जाऊन फिर्यादी सचिन चौधरी याची कसून चौकशी करून रक्ताने माखलेले काचेचे तुकडे दाखवले असता चौधरींची भंबेरी उडाली आणि हे कृत्य स्वत:च वैयक्तिक ताणतणावातून केले असल्याची कबुली चौधरी याने दिली.
फिर्यादी चौधरी यानेच गोळीबाराचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वांगडे यांनी सांगून चौधरी याने खोटी फिर्याद देऊन पोलिस यंत्रणेला वेठीस धरले. याबाबत फिर्यादी चौधरी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे वांगडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज