अ‍ॅपशहर

शिर्डीचे रेल्वेस्थानक बनले कॅशलेस

रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये शिर्डीचे स्थानक हे डिजिटल व्यवहार करण्यासाठी पूर्णपणे सक्षम बनले आहे. सोलापूर विभागातील कॅशलेस सुविधांनी युक्त बनलेले हे पहिले स्थानक असल्याची माहिती देण्यात आली.

Maharashtra Times 27 May 2017, 8:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sainagar shirdi railway station become cashless
शिर्डीचे रेल्वेस्थानक बनले कॅशलेस


रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये शिर्डीचे स्थानक हे डिजिटल व्यवहार करण्यासाठी पूर्णपणे सक्षम बनले आहे. सोलापूर विभागातील कॅशलेस सुविधांनी युक्त बनलेले हे पहिले स्थानक असल्याची माहिती देण्यात आली.

शिर्डी रेल्वेस्थानकावर विनाआरक्षित तिकीट, आरक्षित तिकीट, उपहारगृह व पार्सल कार्यालय या सर्वठिकाणी पॉस (point of sale machine) मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना येथे कॅशलेस पद्धतीने व्यवहार करणे सहज शक्य होणार असून प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज