अ‍ॅपशहर

नेवाशात पाच लाख भाविक

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा शहरात भाविकांनी गुरुवारी कामिका एकादशीनिमित्त गर्दी केली होती. जवळपास पाच लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. माऊली माऊली जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

Maharashtra Times 21 Jul 2017, 3:00 am
म.टा.वृत्तसेवा,नेवासे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saint fair in nagar
नेवाशात पाच लाख भाविक


संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा शहरात भाविकांनी गुरुवारी कामिका एकादशीनिमित्त गर्दी केली होती. जवळपास पाच लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. माऊली माऊली जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा संगीता बर्डे व दत्तात्रय बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व शुभांगी पाटील यांच्या हस्ते मंदिरातील पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. भास्करगिरी महाराज, सुनीलगिरी महाराज, शिवाजी महाराज देशमुख, आमदार बाळासाहेब मुरकुटे, उद्योजक प्रभाकर ससे यांच्या हस्ते भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले. शहरामध्येही उद्योजक रवीराज तलवार यांनी भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप केले. लहुजी वस्ताद ग्रुप व इंजिनीअर सुनील वाघ मित्र मंडळाच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले. मध्यमेश्वर पतसंस्था, मारुतराव घुले पतसंस्थेच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले. दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादकांनी दुधाचे वाटप केले. ज्ञानराज वारकरी भजनी मंडळ नेवासा यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा या वेळी देण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. दर्शन बारीची रांग दीड किमीवर असणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत गेली होती. मुख दर्शनाची व्यवस्था मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून केली होती.

परिसरात पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, होमगार्ड जवानांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर रस्त्यावर दुतर्फा दुकानात गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो दिंड्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करीत हजेरी लावली होती. शहरातील मोहिनीराज मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज