अ‍ॅपशहर

संभाजीराजांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी नगर शहरातून शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या पुढाकाराने मूक पदयात्रा काढण्यात आली. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप कल्याण रोडवरील नेप्ती नाका येथील संभाजी महाराज चौकात झाला.

Maharashtra Times 28 Mar 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sambhaji greeting
संभाजीराजांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी नगर शहरातून शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या पुढाकाराने मूक पदयात्रा काढण्यात आली. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप कल्याण रोडवरील नेप्ती नाका येथील संभाजी महाराज चौकात झाला.
संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते वढू बुद्रुक (जि. पुणे) येथून धर्मज्वाला घेऊन आले होते. सोमवारी सायंकाळी येथील शिवाजी महाराज चौकामध्ये ही धर्मज्वाला आणण्यात आली. त्यानंतर येथून मूक पदयात्रा निघाली. माळीवाडा वेस, आशा टॉकीज रोड, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, नालेगाव मार्गे पदयात्रा नेप्ती नाका येथील संभाजी महाराज चौकामध्ये पोचली. याठिकाणी संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पदयात्रा यशस्वीतेसाठी देवीदास मुदगल, वृषभ गादीया, सागर ठोंबरे, केतन बडवे यांनी परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज